सामाजिक

भिगवण येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद.

प्रविण माने यांच्या संकल्पनेतून तालुकाभर शिबिर राबवले जाणार.

इंदापूर,दि.२९

  • इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास भिगवणकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. भिगवण ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत ८६४ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ३९४ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १६ नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पुढील ८ दिवस तालुक्यातील पळसदेव, बिजवडी, काटी, वडापुरी, निमगाव, निमसाखर, सणसर, लासुर्णे, निरवांगी, माळवाडी, इंदापूर, कळस, वालचंदनगर, बावडा, लाखेवाडी या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे तरी याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रवीण माने यांनी केले.

भिगवण येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे दादासाहेब थोरात, आप्पासो गायकवाड, पंकज काशिद, प्रसाद जगताप यांनी आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच दीपिकाताई क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, प्रदीप गायकवाड, मनोज राक्षे, अण्णासाहेब धवडे, मनोहर बापू हगारे, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, केशवराव भापकर, कुंडलिक धुमाळ, निलेश मोरे, धनंजय थोरात, महेश जगताप, आकाश बंडगर, जयश्रीताई धुमाळ, दादा मारकड, छगन बनसुडे, नागेश गायकवाड, श्रीकांत काशीद, शरद शिर्के, गणेश मोहिते व भिगवण येथील आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!