रडीचा डाव खेळू नका ; हिम्मत असेल लढून दाखवा- संग्राम निंबाळकर.
संग्राम निंबाळकर यांचे श्री जय भवानीमाता पॅनल प्रमुखांना उघड आव्हान.

भवानीनगर, दि.१३ (जितेंद्र जाधव)
- इंदापूर तालुक्यामध्ये लोकसभा व विधानसभेनंतर राजकीय वातावरण श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीने पुन्हा तापले आहे. त्यातच श्री छत्रपती बचाव पॅनल चे उमेदवार संग्राम निंबाळकर यांनी श्री.जय भवानीमाता पॅनलच्या प्रमुखांनी आमचे उमेदवार घेऊन जाण्याचा रडीचा डाव खेळू नये. हिम्मत असेल तर १८ तारखेला लढून दाखवा असे उघड आव्हान दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या श्री छत्रपती साखर कारखान्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आली आहे. मात्र गेली दहा वर्ष साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली नव्हती ती निवडणूक सध्या सुरू आहे. त्यातच छत्रपती साखर कारखाना अडचणीत असल्याने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या निवडणुकीत दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.या श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यातच श्री छत्रपती बचाव पॅनल चे उमेदवार तुकाराम काळे यांना आपल्याकडे खेचण्यात श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रमुखांना यश आले आहे. मात्र नंतर श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार संग्राम निंबाळकर यांनी जय भवानीमाता पॅनलच्या प्रमुखांना उघड आव्हान देत जर तुम्हाला भीती नसेल तर आमच्या पॅनलचे उमेदवार का फोडता,असा “रडीचा डाव खेळू नका’ हिम्मत असेल तर १८ तारखेला लढून दाखवा असे म्हटले आहे.
श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट असून छत्रपती साखर कारखान्याचा मतदार हा सुज्ञ आहे. काय खरे व काय खोटे हे त्यांना समजते. ज्यांनी गेली दहा वर्ष कारखान्यातील मतदारांना त्रास दिला व बदनामी केली त्यांना मतदार कात्रज चा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असे संग्राम निंबाळकर यांनी म्हटले आहे.
त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना एकमेकांवरती आरोप- प्रत्यारोपाच्या करताना पाहायला मिळत आहे.



