राजकीय

दत्तात्रय भरणे भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार.?

शरद पवारांच्या दबावाला बळी न पडणारे अजित पवारांचे विश्वासू आमदार.

इंदापूर,दि २४

राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच इंदापूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.मात्र इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत असून तशी अपष्टपणे पुष्टी काल इंदापूर मध्ये झालेल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मिळाली आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघ कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. महायुती असो अथवा महाविकासआघाडी इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा कायम केंद्रस्थानी असतो. या मतदारसंघात विधानसभेच्या उमेदवारी वरून मित्र पक्षात कायम वादविवाद निर्माण झाल्याचे आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यातच विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर शरद पवार यांना न जुमानता अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावल्याने दत्तात्रय भरणे यांच्या वरती अजित पवारांचा प्रचंड विश्वास आहे.

त्यातच भाजप,शिवसेना युती सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घरोबा केल्याने इंदापूर विधानसभा मतदारसंघ नव्याने निर्माण झालेल्या महायुतीमध्ये हॉटस्पॉट बनला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान सीटिंग आमदार दत्तात्रय भरणे हे असल्यामुळे महायुतीमध्ये पडद्याआड झालेल्या चर्चेत ज्या विधानसभा मतदारसंघात जो सीटिंग आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा सोडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना देऊन तयारी करा असे पक्षश्रेष्ठींचे आदेश आल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पासून विभक्त होऊन भाजपसोबत गेलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा दत्तात्रय भरणे यांच्यासाठी झाल्यास नवल वाटणार नाही. कारण, दत्तात्रय भरणे हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष इंदापूर विधानसभेची जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर त्यानंतर अजित पवारांनी घेतलेल्या जनसन्मान यात्रेच्या सभेत मला व दत्तात्रय भरणे यांना ताकद द्या म्हणत अपष्टपणे उमेदवारी जाहीर केल्याचे चित्र आहे. मात्र औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सध्यातरी दिसत आहे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही मान्य केले सिटिंग आमदारांना उमेदवारी..!!

काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माध्यमांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की ज्या पक्षाचा सीटिंग आमदार त्याच पक्षाला त्या ठिकाणी जागा सोडल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!