राजकीय

दादा,मामा आणि बापूंच्या माध्यमातून छत्रपती च्या अडचणी दूर होतील-पृथ्वीराज घोलप.

भवानीनगर, दि.१४

  • इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. छत्रपती साखर कारखाना हा या भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून कारखान्याच्या तांत्रिक अडचणी केवळ दादा,मामा व बापूंच्या माध्यमातून दूर होतील असे मत श्री.जय भवानीमाता पॅनल चे उमेदवार पृथ्वीराज घोलप यांनी व्यक्त केले.

पृथ्वीराज घोलप म्हणाले की काही लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित असताना. लोकांवरती व सभासदांवरती लादण्याचे काम केले. त्यांना कारखान्यापेक्षा मान- सन्मान महत्त्वाचा वाटतो. कारखान्यावरील बेगड प्रेम लोकांना दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे. मात्र कारखाना परिसरातील सभासद आणि मतदार प्रचंड हुशार असून कारखान्याचे हित लक्षात घेता ते आमच्या श्री.जय भवानीमाता पॅनलच्या उमेदवारांना निवडून देतील.

विशेष म्हणजे माझ्यासारख्या नवख्या तरुणाला कारखान्यामध्ये काम करण्यासाठी दादा, मामा व बापूंनी उमेदवारी दिली. दादा,मामा व बापू हे केवळ कारखान्याचे हित पाहतात. त्यांच्या दृष्टीने कारखाना महत्त्वाचा असून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देणे हीच त्यांची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे श्री.छत्रपती साखर कारखान्याच्या सभासदांच्या व कारखान्याच्या काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी दादा,मामा व बापूंच्या पाठीमागे सर्व मतदार उभे राहतील असा विश्वास पृथ्वीराज घोलप यांनी व्यक्त केला.

“पृथ्वीराज’ पर्व…..!!

पृथ्वीराज घोलप हे छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार आहेत. आजपर्यंत पृथ्वीराज घोलप यांच्यावर कोणताही चुकीचा आरोप अथवा ठपका नाही. पृथ्वीराज घोलप यांची युवकांमध्ये व छत्रपतीच्या मतदारांमध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे छत्रपतीच्या या निवडणुकीच्या माध्यमातून तरुण “पृथ्वीराज’ पर्वाला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!