भिगवण मधील पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात.

इंदापूर, दि.१३
- शासकीय खात्यातील अधिकाराचा दुरुपयोग करत होणाऱ्या आर्थिक भ्रष्टाचारात महसूल विभागापाठोपाठ पोलीस खात्याचा नंबर लागतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल व पोलीस प्रशासनात अनेक चांगले अधिकारी कार्यरत असले तरी काही अधिकाऱ्यांना भ्रष्ट कारभाराची लागण झाली की काय असे म्हणण्याची वेळ अनेकदा येते. कारण आज इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशन मधील एका उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याला लाच घेताना ACB च्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्याभरात इंदापूर तालुक्यामध्ये एसीबीने सलग दुसरी कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत महसूल कर्मचारी आणि आज केलेल्या दुसऱ्या कारवाईत पोलीस अधिकारी एसीबीच्या गळाला लागला आहे. विशेष म्हणजे आजच्या झालेल्या कारवाईमध्ये भिगवण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.
इंदापूर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासनाला यश आले आहे. तालुक्यातील इंदापूर, वालचंदनगर व भिगवण परिसरातील अनेक अवैध धंद्यावरती थेट कारवाई करून पोलीस प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरटे मोडले आहे. लोकांचाही पोलीस प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे .कारण,प्रत्येक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे अतिशय चांगले काम करत आहेत.
मात्र,भिगवण पोलीस स्टेशन परिसरात उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडल्याने लोकांच्या तोंडून उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. सदर घडलेल्या प्रकरणाबाबत कारवाई सुरू आहे.