राजकीय

जय पवार यांचा बारामती तालुक्यात भेटीगाठी दौऱ्याला सुरुवात.

बारामती,दि.१४

  • बारामती मधून राज्याचे राजकारण सध्या चालत असून बारामती मध्ये ठरेल ते सूत्र राज्यामध्ये अवलंबले जात आहे. त्यातच खुद्द बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटीगाठी दौरा आज सुरू केला आहे.

आज जय पवार हे बारामती तालुक्यातील गडदवाडी, खंडोबाचीवाडी व निंबुत या गावच्या दौऱ्यावरती असून या गावांमधील नागरिकांसहित कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन लोकांच्या समस्या जागच्या जागी सोडवण्याचे काम केले जाणार आहेत. तसेच बारामती तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती तालुक्याचे लोकप्रतिनिधी अजितदादा यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती जय पवार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत.

सध्या स्थितीला बारामती तालुका हा राज्यामध्ये नंबर एकचा तालुका बनवण्यात अजित पवार यांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील ही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा विकास केल्याचे मान्य करतात. एकेकाळी जिरायती असलेल्या तालुका बागायती करण्यात व देश परदेशातील उद्योग बारामती मध्ये आणण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे.

त्यामुळे अजित पवार यांना कितीही विरोध होत असला तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचा विजय गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने होणार असल्याची खात्री बारामती तालुक्यातील सर्वसामान्य मतदार व जनता देत आहे. त्यातच जय पवार यांनी बारामती तालुक्यात ग्रामीण भागात काढलेल्या भेटीगाठी दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांच्या अंगातील मरगळ झटकून पुन्हा कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!