‘उपरा’ उमेदवार म्हणून हिणवले;पण यशराज च्या दणदणीत विजयाने विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला!
यशराज जगदाळेंचा दणदणीत विजय, भाजपचा सपशेल पराभव.

इंदापूर,दि.१२
- वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यशराज आप्पासाहेब जगदाळे यांनी विरोधकांचा दणदणीत पराभव करत राजकीय वर्तुळात मोठा धक्का दिला आहे. प्रचारादरम्यान ‘उपरा उमेदवार’ म्हणून हिणवणाऱ्या विरोधकांनाच त्यांनी १३००० पेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत करत थेट कात्रजचा घाट दाखवला.
यशराज जगदाळे हे जिल्हा परिषदेत निवडून आलेले सर्वात तरुण उमेदवार ठरले असून, तरुणाईचा उत्साह, विकासाचा दृष्टिकोन आणि जनतेचा विश्वास यांचा प्रभाव या निकालातून स्पष्टपणे दिसून आला.
भाजपच्या प्रचारसभांमधून सातत्याने यशराज जगदाळेंवर वैयक्तिक टीका करण्यात आली. मात्र, ज्या गावांमधून टीका झाली, त्याच गावांतून यशराज जगदाळेंनी मोठे मताधिक्य घेत विजय संपादन केला, हे विशेष ठरले.
यशराज जगदाळे यांचे वडील आप्पासाहेब जगदाळे हे इंदापूरच्या राजकारणात व समाजकारणात अनेक वर्षांपासून अग्रस्थानी असलेले नेतृत्व आहे. त्याचबरोबर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांची यशराज जगदाळेंना खंबीर साथ लाभली.यशराज जगदाळेंच्या झंजावाती प्रचारापुढे विरोधक पूर्णपणे हतबल झाले होते.
यशराज जगदाळे च्या उमेदवारीवर टीका करणाऱ्यांना मतदारांनी मतपेटीतून चोख प्रत्युत्तर दिले.या विजयामुळे वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली असून, यशराज जगदाळेंच्या माध्यमातून या गटाचा सर्वांगीण कायापालट निश्चित होणार, असा विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे.



