इंदापूर शहर व परिसरात मटका, गुटखा आणि दारू विक्री जोरात चालू असल्याची चर्चा…?
इंदापूर,दि.२९
- राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावरती आणि विक्री वरती बंदी असताना. इंदापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरात मटका, गुटखा आणि दारू विक्रीने धुमाकूळ घातला आहे.वरील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची चर्चा सध्या जागोजागी रंगू लागली आहे.
सध्या इंदापूर शहर व परिसरात नाना,दादा,मामा,आप्पा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींचे अवैध धंदे जोमात असून प्रशासन मात्र कोमात गेल्याचे बोलले जात आहे. चौका-चौकात सर्रास मटका घेणारे राजरोसपणे वावरत आहेत. त्या लोकांना पोलिसांचे कसलेही भय उरले नाही. कारण प्रशासनातीलच काही अधिकारी नाना, दादा, मामा, आप्पा या नामक व्यक्तीला पाठीशी घालत आहेत.
सध्या इंदापूर पोलीस स्टेशनला शिस्तप्रिय असलेले पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे लाभले आहेत. मात्र शिस्तप्रियाधिकारी असताना इंदापूर शहर व परिसरात परिसरात अवैध धंद्याने सुळसुळाट घातला आहे. या अवैध धंद्यामुळे अनेक गोरगरिबांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. तर काहींना स्वतःची शेतीबाडी विकून ही मटका, गुटखा आणि दारू चा नाद सुटेना झाला आहे.
अवैध धंदे वाल्यांकडून अनेकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ झाल्याची चर्चा…?
इंदापूर शहर व परिसरात राजरोसपणे चालू असलेल्या अवैध धंदेवाल्याकडून मागील दहा-पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ झाली असल्याची चर्चा रंगू लागल्याने..? या चर्चांना कधी पूर्णविराम मिळणार…? आणि संबंधित अवैध धंदेवाल्या वरती कधी कारवाई होणार…का ? याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.