कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा फोटो सोशल मीडियात वायरल.

इंदापूर,दि.२३
- इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात इंदापूर मध्ये उपोषण सुरू असताना. दुसरीकडे मात्र, त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वायरल होत असलेल्या फोटोमध्ये असे लिहिले आहे की “कर्तव्य हाच धर्म” मानून ज्यांनी आपल्या सेवेत सातत्याने प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसंपर्क जपला आहे अशा सूर्यकांत कोकणे यांचे नाव पोलीस दलात आदराने घेतले जाते.
पोलीस खात्यातील दीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या निभावताना न्याय आणि पारदर्शकता या तत्वांना नेहमी प्राधान्य दिले. गुन्हे उकलणे, कायदा-सुव्यवस्था राखणे, सामाजिक सलोखा टिकवणे या क्षेत्रात त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता उल्लेखनीय आहे. गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याबरोबरच समाजातील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपणे हाच त्यांचा कार्याचा पाया राहिला आहे.
कोकणे सरांची कार्यशैली नेहमी संतुलित राहिली. काटेकोर तपास करताना त्यांची नजर तपशीलावर असते, तर नागरिकांशी वागताना सौम्यता आणि संवेदनशीलता यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांची उकल अल्पावधीत झाली असून त्यामुळे जनतेचा पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला.
याशिवाय समाजाभिमुख उपक्रम राबवण्यातही त्यांचा पुढाकार राहिला आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कायद्याचे भान, वाहतूक सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे, तरुणांना गुन्हेगारीच्या मार्गापासून परावृत्त करणे अशा उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संकटाच्या प्रसंगी – मग ते नैसर्गिक आपत्ती असो किंवा गंभीर गुन्हा – कोकणे सरांनी धैर्याने आणि तत्परतेने जबाबदारी स्वीकारली.
त्यांच्या कार्यामुळे आज समाजात “कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी” ही ओळख केवळ नावापुरती राहिलेली नाही तर ती प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध झालेली आहे. सूर्यकांत कोकणे यांची कार्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन हे आगामी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
वरील मजकूर सोशल मीडियात वायरल होत असलेल्या फोटो मध्ये लिहिला आहे.याच पार्श्वभूमीवर त्यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर आले आणि अल्पावधीतच ते हजारो लोकांपर्यंत पोहोचले. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांसह विविध माध्यमांवर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणात नेटिझन्सकडून शेअर होत आहे.



