श्री.छत्रपतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मदत केलेल्या मतदारांचे आभार :- संग्रामसिंह निंबाळकर.
यापुढे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढू.

भवानीनगर,दि.१९
- निवडणुकीमध्ये जिंकणे अथवा पराभूत होणे हे समीकरण कायम ठरलेले असते. परंतु, निवडणुकीनंतर अपयश आले तरी ज्या मतदारांनी, कार्य़कर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा संभाळली, त्यांचे आभार मानणे हा संस्काराचा भाग असतो. अशाच पद्धतीचा प्रत्येय आज श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीनंतर आला. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार संग्रामसिंह निंबाळकर यांनी सर्व सभासद मतदार, कार्यकर्ते व पॅनल प्रमुखांचे आभार मानले आहेत. तसेच निवडून आलेल्या संचालक मंडळाला शुभेच्छा ही दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनलने २१ जागा जिंकत कारखान्यावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व मिळवले आहे. तर माझे अध्यक्ष अविनाश घोलप, मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती बचाव पॅनल चा पराभव झाला आहे.
बातमी चे बोला’ या डिजिटल न्यूज चॅनलशी बोलताना संग्रामसिंह निंबाळकर म्हणाले श्री.छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत आम्ही छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी पॅनलला आव्हान दिले. कोणतीही मोठी ताकद व साधने नसताना छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील सुज्ञ सभासदांनी आम्हाला भरघोस मतदान केले.
कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून यापुढे नवनिर्वाचित संचालक मंडळांनी कारखान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू, सभासद – कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संचालक मंडळाला सहकार्य करू.गेल्या दहा वर्षाची पुनरावृत्ती झाली तर आम्ही कामगार व सभासदांसोबत रस्त्यावरची लढाई सुद्धा लढू.



