समृद्ध पंचायत अभियानांतर्गत शहा येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
“अॅनिमिया मुक्त भारत” मोहिमेअंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन.

इंदापूर,दि.१०
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, हिंगणगाव यांच्या माध्यमातून शहा येथे “अॅनिमिया मुक्त भारत” तसेच सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले.
या शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी विविध तपासण्यांचा व उपचारांचा लाभ घेतला. डॉ. समीर मुलाणी, डॉ शरद शिर्के, डॉ सुवर्णा शिंदे यांनी स्वतः उपस्थित नागरिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या.
आरोग्य विभागाच्या कार्यसंघाकडून शिबिरात खालील तपासण्या करण्यात आल्या –
नेत्र तपासणी : 19 लाभार्थी
मोतीबिंदू निदान : 12 रुग्ण
NCD Screening : 86 नागरिक
रक्त तपासणी (कॅन्सर तपासणी – CBC, CA125, CA19.9, BSL, Thyroid) : 56
जनरल ओपीडी तपासणी : 196 रुग्ण.
आभा कार्ड नोंदणी : 35 नागरिक.
सकाळपासूनच शिबिरात गर्दी दिसून आली. विशेषतः महिलांनी रक्त व कॅन्सर तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.आरोग्य सेवकांनी तपासणीनंतर लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले.
आरोग्य शिबिराचे आयोजन शहा गावचे विद्यमान सरपंच श्री. दिलीप पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी, आशा वर्कर्सनी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून शिबिर यशस्वी केले.
शिबिरास इंदापूर पंचायत समितीचे समितीचे अधिकारी सचिन खुडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिबिरातील कामकाजाची पाहणी केली.त्यांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांचे कौतुक करत अशा उपक्रमांनी ग्रामस्तरावर आरोग्य जागरूकता वाढीस लागते असे मत व्यक्त केले.
शिबिरानंतर गावकऱ्यांनी सांगितले की, अशा आरोग्य उपक्रमांमुळे गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचत आहे.ग्रामस्थांनी सरपंच आणि आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले.अशा शिबिरांमुळे ग्रामस्तरावर आरोग्य साक्षरता वाढीस लागून “सुदृढ ग्राम, समृद्ध भारत” हे स्वप्न साकार होत आहे.



