महाराष्ट्र
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली; संदीप गिल नवे ग्रामीण पोलीस अधीक्षक.
इंदापूर,दि.५
- राज्याच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई पदी बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त संदीप सिंग गिल यांची पदोन्नती झाली असून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी संदीप सिंग गिल यांचे बदली झाली आहे
संदीपसिंह गिल हे धडाकेबाज अधिकारी म्हणून गणले जातात. पुणे शहरात उपायुक्तपदाची जबाबदारी पार पडताना त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. गणेशोत्सवाची तयारीत ते होते. त्याच कालावधीत त्यांची बदली झाली आहे.