विशेष
इंदापूर पोलीस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती.
के बी शिंदे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती.
इंदापूर,दि.२२
- पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल ५९ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.
इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के बी शिंदे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाहून पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर पोलीस हवालदार संजय मल्हारी, सुरेंद्र वाघ व शुभांगी जाधव यांना पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. दरम्यान, इंदापूर पोलीस स्टेशनच्या पदोन्नती झालेल्या चौघांचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी अभिनंदन केले असून चौघांच्या झालेल्या पदोन्नतीमुळे त्यांचे इंदापूर तालुक्यातून कौतुक होत आहे.