राजकीय

इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांच्या कोपरा बैठका सुरू.

इंदापूर,दि.१

  • आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून तयारीला जोर आला असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जाणाऱ्या कोपरा बैठका सुरू झाल्या आहेत.

नगरपालिका निवडणुकीस अवघे काहीच दिवस शिल्लक असताना, गारटकर यांच्या दौऱ्यांमुळे इंदापूर शहरात आणि आसपासच्या प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या बैठकींत कार्यकर्त्यांचा उत्साह, लोकांचा सहभाग आणि गारटकर यांचा संवाद पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणुकीस सज्ज झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून लवकरच इंदापूर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोषणेनंतर पक्षांतर्गत मोर्चेबांधणी अधिक वेग घेणार असल्याचे स्पष्ट आहे. अनेक इच्छुक उमेदवार पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात असून, गारटकर स्वतः सर्वसमावेशक आणि विजयी उमेदवार निवडण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती मिळते.

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या संघटनात्मक ताकदीसह अजित पवार गटाने आगामी निवडणुकीसाठी गंभीर तयारी सुरू केली आहे. प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे, आणि जनसंपर्क मोहिमा या सर्व बाबींचे नियोजन सुरू आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची महत्त्वाची बैठक इंदापुरात होणार असून, त्यात नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय तयारीवर अंतिम चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीनंतर इंदापूरमधील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!