सामाजिक
इंदापूर पोलीस स्टेशनच्या पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा महारुद्र पाटील यांच्या कडून सत्कार संपन्न.
इंदापूर,दि.२२
- पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल ५९ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. त्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली होती.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यअध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या माध्यमातून पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना महारुद्र पाटील म्हणाले की इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हे अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. त्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आहे. यापुढेही ते असेच उत्तम कामगिरी करत राहतील. एक सामाजिक जाणीव म्हणून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडळकर, समदभाई सय्यद, शहराध्यक्षा रेश्मा शेख, युवकचे कार्याध्यक्ष मखरे, सामाजिक विभागाचे कार्याध्यक्ष विकास खिलारे सह आदी मान्यवर उपस्थित होते.