विशेष
जनता ही माझं सुरक्षा कवच मला पोलीस संरक्षणाची गरज नाही :- आ दत्तात्रय भरणे.
आमदार भरणे यांनी पोलीस संरक्षण नाकारले.
इंदापूर,दि.५
- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना देण्यात आलेला शस्त्रधारी अंगरक्षक म्हणजेच पोलीस संरक्षण नाकारले आहे. जनता हीच माझे सुरक्षा कवच असून मला पोलीस संरक्षणाची गरज नाही असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना आ. भरणे म्हणाले की संपूर्ण इंदापूर तालुका हे माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबामध्ये वावरताना मला कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज भासत नाही. तसेच इंदापूर तालुक्यातील मायबाप जनता हे माजी सुरक्षा कवच असून मला पोलीस संरक्षणाची आवश्यकता वाटत नाही.
आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून गेले आहेत. त्यांचा जनतेशी थेट संपर्क असल्याने त्यांना पोलिसांच्या गराड्यात वावरणे आवडत नाही.