मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत इंदापूर नगर परिषदेच्या वतीने नोंदणी शिबिर संपन्न.
इंदापूर,दि.२१
- इंदापूर नगरपालिकेच्या वतीने व्यंकटेश नगर मंदिर, वडार गल्ली समाज मंदिर, संत रोहिदास समाज मंदिर, जुनी मंडई बागवान गल्ली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, सरस्वती नगर अंगणवाडी,संत सावता माळी मंदिर अशा ठिकाणी लाभार्थी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
शहरातील ३१ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने नोंदणी कार्यक्रम ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीही घेण्याचे नियोजन करण्यात आलेले होते.या कार्यक्रमासाठी आ. दत्तात्रय मामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तहसीलदार श्रीकांत पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन खुडे आणि शहरातील बचत गटातील महिला लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
इंदापूर नगरपरिषद कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.या कक्षामध्ये सुभाष ओहोळ सहाय्यक प्रकल्प अधिकारी व योगिता सरगर (समुदाय संघटक) या काम पाहत आहेत.
नगरपरिषदेसमोरील प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमात तहसील कार्यालय इंदापूर यांच्या वतीने शहरातील सर्व रेशन कार्डधारकांना बोलवण्यात आले होते.ज्या महिला लाभार्थी यांचे रेशन कार्ड मध्ये नाव नाही किंवा रेशन कार्ड मध्ये बदल करण्यास दिलेले आहे. अशा अडचणी संबंधी नागरिकांनी त्या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब यांच्यावतीने करण्यात आले.