पुणे,दि.२५
- गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशात आता पुणे शहरातील सर्व शाळांना आज २५ जुलै, २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे.
पुणे शहरातील शाळांना २५ जुलै, २०२४ रोजी सुट्टी !
हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 25, 2024
एक्सवर पोस्ट करत राज्यमंत्री मोहळ म्हणाले, “हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
दरम्यान लोणावळ्यात ढगफुटी सदृष्य पाऊस सुरू असून नगरपरिषदेने 25 आणि 26 जुलै रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.