१९९७ साली इंदापूर मधील दर्गा मज्जिद चौकातील शिवजयंती निमित्त काढलेल्या छायाचित्रांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा.

इंदापूर,दि.१
काल छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण तसेच वातावरण इंदापूर शहरात होते. काल इंदापूर शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. अशाच प्रकारे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात व फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये १९९७ साली इंदापूर मधील दर्गा मज्जित चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली होती.
१९९७ साली पै. हमीद भाई सय्यद बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठान-इंदापूर या संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात इंदापूर शहरातील दर्गा मज्जिद चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली होती. या शिवजयंतीला इंदापूर शहरातील अनेक शिवभक्त, नेतेमंडळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचे छायाचित्र काल १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहण्यासाठी मिळत असून या छायाचित्राने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
सदरच्या छायाचित्रात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,अविनाश घोलप, मुकुंद शहा,गिरीश शहा, कृष्णा ताटे सर, शिवाजीराव मखरे,कैलास कदम,पोपट पवार ,जाकीर काजी,बाळासाहेब मोरे,बाबर सर,तात्या आदलिंग,शकील बागवान दिसत आहेत.