विशेष

इंदापूर मधील फूटपाथवरील बेकायदेशीर पार्किंगचा वयोवृद्धांना नाहक त्रास…?

पार्किंग केलेल्या गाड्यांवरती कारवाई होणार का...?

 

इंदापूर,दि.१३

  • दिवसेंदिवस इंदापूर शहरामध्ये रहदारीचे व लहान मोठ्या वाहनांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. लहान मोठ्या वाहनांसाठी इंदापूर शहरात अधिकृत पार्किंगची जागा अपुरी आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या फुटपाथवर काही दुकानदार आपल्या गाड्या पार्किंग करत असल्याने वयोवृद्ध व्यक्तींन सह लहान शाळकरी मुलांना या फुटपाथवरून चालताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित गाडीवरती व गाडी मालकावरती कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इंदापूर शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून जुना पुणे-सोलापूर या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा इंदापूर शहरांमधील व बाहेरून खरेदी विक्री सह इतर कामांसाठी आलेल्या लोकांना चालण्यासाठी फूटपाथ बांधण्यात आला आहे. मात्र या फुटपाथ वरती अनेक जण बेकायदेशीरपणे आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग करत असल्याने या फुटपाथवरून चालणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींसह लहान मुलांना नाहक त्रासला सामोरे जावे लागत आहे. या पार्किंग वरती चालताना पार्किंग केलेल्या बेकायदेशीर गाड्यांमुळे रस्ता अपुरा झाल्याने लहान मोठे अनेक अपघात घडले आहेत.

विशेष म्हणजे इंदापूर नगरपालिकेसमोर जुना पुणे- सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या फुटपाथ वरती मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहे. या ठिकाणाहून लहान शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांची जास्त वर्दळ असते. त्याच ठिकाणी अनेकांनी आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग केल्याने अनेक वयोवृद्ध लोकांसहित लहान मुलांना या फुटपाथ वरून चालता येत नाही. त्यामुळे संबंधित पार्किंग केलेल्या गाडीवरती व गाडीमालकावरती कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य लोकांवर केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!