राजकीय

हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार ? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल.

पाटलांची दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर.

इंदापूर,दि.२७

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडतानाचे चित्र आहे. अशातच जागावाटपानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा सुरू आहे. अशातच भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहेत, त्या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार स्पष्टीकरण देखील दिले आहे.

मात्र, पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे सोशल मिडियावरती हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल झालेल्या या फोटोवरती ‘नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी’ असं लिहण्यात आलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हर्षवर्धन पाटील येणार अशा पद्धतीची सध्या सोशल मीडियात पोस्टर व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोवर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘याआधी देखील असे बॅनर व्हायरल झाले आहेत. परंतु आम्हीच आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांचे वाटप झालेलं नाही. आम्ही वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडं लक्ष ठेवून आहोत असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. पितृ पक्ष पंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.

हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी….

याआधी इंदापूरमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर इंदापूर तालुक्याची झाली तयारी …..हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…. असं लिहण्यात आलं होतं. इंदापूरच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भर चौकात एक फ्लेक्स लागला होता. त्यावर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो होते. तर मजकूर अचंबित करत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!