सामाजिक
“मल्हार’ च्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेतील मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप.
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.
इंदापूर,दि २२
- दि. २ फेब्रुवारी रोजी समाजातील वंचित आणि विशेष मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना मनामध्ये बाळगून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी मुलगा मल्हार खुडे याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत इंदापूर मधील मतिमंद शाळेतील मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी संपूर्ण खुडे कुटुंब उपस्थित होते.
विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत, मतिमंद शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा करून खुडे कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून स्वतः गटविकास अधिकारी सचिन खुडे व त्यांचे कुटुंबाने मतिमंद मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप केले. या उपक्रमामुळे मतिमंद शाळेतील मुलांचा आनंद झाला होता.
या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे यांनी मल्हार खुडे याला शुभेच्छा देत गटविकास अधिकारी खुडे यांचे आभार मानले आणि अशा सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जाईल असल्याचे म्हटले.
यावेळी पंचायत समिती कर्मचारी, खुडे कुटुंबातील सदस्य, सर्व स्नेही मित्रपरिवार उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसामुळे गटविकास अधिकारी सचिन खुडे व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.