देश-विदेश

आसाराम बापू मुंबई दाखल; मात्र विमानात का झाला राग अनावर..?

मुंबई,दि.२९

  • लौंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना आज विमानाने उपचारासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आले. आसाराम बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून सात दिवसांच्या उपचारांसाठी पॅरोल मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापू इंडिगोच्या नियमित फ्लाइटने मुंबईला पोहोचले आहेत. जोधपूर पोलीस आयुक्तालयचे स्टेशन अधिकारी हनुमान सिंह यांनी सांगितले की, आसाराम बापू यांना कडेकोट बंदोबस्तात मध्यवर्ती कारागृहातून विमानतळावर आणण्यात आले. मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आसाराम बापूंना घेऊन रुग्णवाहिका निघाली. यावेळी फ्लाइटमध्ये आसाराम बापू हे पोलिसांवर चिडताना दिसले.

आसाराम बापू यांच्यावर महाराष्ट्रातील माधवबाग रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पाठवले गेले आहे. त्यांच्यासोबत सशस्त्र सैनिकांची तुकडीही पाठवण्यात आलीये. आसाराम बापू यांना काल जोधपूर मध्यवर्ती कारागृहात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुरुंगातून बाहेर आणले गेले. आसाराम बापू यांना 50,000 रुपयांचा बाँड आणि प्रत्येकी 25,000 रुपयांची स्वतंत्र जामीन भरावी लागली. न्यायमूर्ती पुष्पेंद्र भाटी आणि मुन्नरी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूर एम्सच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्यांना सात दिवसांसाठी पॅरोल मंजूर केला आहे. पॅरोलची वेळ खापोलीला पोहोचल्यापासून मोजली जाईल, असे हायकोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे. प्रवासाची वेळ पॅरोलमध्ये समाविष्ट केली जाणार नाही.

उपचारासाठी आसाराम बापू यांना 13 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा अंतरिम पॅरोल मिळाला होता. अंतरिम पॅरोलच्या आदेशात उच्च न्यायालयाने अनेक निर्बंध घातले आहेत. असिस्टंट आणि डॉक्टर व्यतिरिक्त आसाराम बापू कोणालाही भेटू शकत नाही. आसाराम यांच्यावर खासगी खोलीत उपचार केले जाणार आहेत. खोलीभोवती 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात असेल.

जोधपूर पोलिसांच्या पथकाने 31 ऑगस्ट 2013 रोजी आसाराम बापू यांच्या आश्रमावर छापा टाकत त्यांना अटक केली होती. आसाराम बापू हे छिंदवाडा येथील आश्रमात सापडला होते. पोलिसांच्या पथकाने आसाराम यांना अटक करून जोधपूरला आणले. 1 सप्टेंबर 2013 पासून आसाराम बापू हे जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. आसाराम बापू यांची शिक्षा 25 एप्रिल 2018 रोजी मध्यवर्ती कारागृहात जाहीर झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!