इंदापूर मध्ये सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करणाऱ्या पाच मुलांवरती गुन्हा दाखल.
"बातमी चे बोला' या डिजिटल न्यूज चॅनलच्या बातमीची दखल.
इंदापूर,दि.१७
- इंदापूर शहरामध्ये दि.१६ रोजी दुपारी बस स्थानकासमोर असलेल्या भिमाई मूलनिवासी पुस्तकालय समोर सार्वजनिक ठिकाणी शाळा शिकत असलेल्या व शाळाबाह्य अल्पवयीन मुलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ बातमीचे बोला या डिजिटल न्यूज चॅनल ने सोशल मीडियामध्ये प्रसारित केला होता. या व्हिडिओची दखल इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घेतली असून फ्री स्टाइल हाणामारी करणाऱ्या पाच जणांविरोधात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर शहरामध्ये गुरुवार दि.१६ रोजी दुपारी इंदापूर बस स्थानकासमोर अल्पवयीन मुलांमध्ये जोरदार हाणामारी व एकमेकांना गलिच्छ शिवीगाळ झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये “बातमी चे बोला’ या डिजिटल न्यूज चॅनल ने प्रसिद्ध केला होता. सदरची बातमी प्रसिद्ध होताच इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ संबंधित प्रकरणातील आरोपी १) केदार लक्ष्मण गोडसे (सातपुते वस्ती, इंदापूर,तालुका-इंदापूर ,जिल्हा- पुणे) २) पृथ्वीराज मधुकर नरूटे, माळवाडी नं-१, ३) सौरभ सुरेश बेंद्रे माळवाडी नं-१, ४) केतन बोडके गलांडवाडी नं-२, ५) ओम धनाजी गलांडे, गलांडवाडी नं-२ या मुलांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रासकर करत आहेत.
इंदापूर शहरात व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये यापुढे कोणी सार्वजनिक ठिकाणी भांडणे,सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला अथवा शाळा, महाविद्यालयांच्या परिसरामध्ये शाळाबाह्य रोड रोमिओ जर मुलांना त्रास देत असतील तर त्यावरती इंदापूर पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत या कारवाईच्या माध्यमातून इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे इंदापूर मधील प्रत्येक ठिकाणी इंदापूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.