सामाजिक
गिरवी-गणेशगाव बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी – हर्षवर्धन पाटील.
बंधाऱ्याला भगदाडाची तिसरी वेळ.
इंदापूर,दि.२९
- नीरा नदीवरील गिरवी-गणेशगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या भरावास पुराच्या पाण्याने शुक्रवारी (दि. 26) भागदाड पडले आहे. परिणामी, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
या बंधाऱ्याला भरावास पुराच्या पाण्याने भगदाड पडण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. निरेला आलेल्या पुराच्या पाण्याने गिरवी गावच्या बाजूला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील गिरवी गावातून माळशिरस तालुक्यातील गणेशगाव कडे होणारे दळणवळण बंद पडले आहे.
जर या बंधाऱ्याच्या भगदाडाची तातडीने दुरुस्ती केली नाही, तर मात्र हा बंधारा पाण्याभोवी कोरडा राहिल्यास बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील पिके धोक्यात येणार आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने बंधाऱ्याच्या भगदाडाची दुरुस्ती करावी, अशी सूचना हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.