महाराष्ट्र
इंदापूर तालुक्यात कार्यकर्त्यांचं ठरलं; इंदापूर तालुका विकास आघाडीच्या १०० शाखा उघडल्या जाणार.
सुरुवात बावडा, भरणेवाडी,सराटी,रुई या गावांपासून..
इंदापूर,दि.२६
- इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकी अगोदर राजकारण तापू लागली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात इंदापूर शहरात विमान या चिन्हाचा बॅनर लागल्यानंतर अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून विविध पक्षाच्या नेत्यांचे बॅनर लावले. मात्र पुढील महिन्यात इंदापूरच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार असून तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या १०० शाखा उघडल्या जाणार आहेत. या सर्व शाखा गाव गावचे सामान्य व स्वाभिमानी कार्यकर्ते उघडणार आहेत.
इंदापूर तालुका विकास आघाडी तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाची महत्त्वाची राजकीय संघटना ठरली आहे. कारण इंदापूर तालुका विकास आघाडीने तालुक्यातून आमदार व कॅबिनेट मंत्री विधानसभेमध्ये पाठवला आहे. तीच इंदापूर तालुका विकासा आघाडी पुन्हा इंदापूर तालुक्यात आपली ताकद आजमावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेपासून इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन १०० शाखा उघडल्या जाणार आहेत. त्यामध्ये पहिली शाखा बावड्यात १ ऑगस्ट रोजी उघडली जाणार आहे. त्यानंतर भरणेवाडी, सराटी व रुई या गावांमध्ये शाखा उघडल्या जाणार आहेत.