विशेष

इंदापुरात लंगडी कोंबडी घेईना म्हणून कामगारांनी केला गाडी ड्रायव्हरचा खून.

इंदापूर,दि ७

  • इंदापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी च्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. त्यातच इंदापुरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला असून पोल्ट्री फार्म मधील लंगड्या कोंबड्या न घेतल्याच्या रागातून पोल्ट्री फार्म वरील कामगारांनी मिळून कोंबड्या नेण्यासाठी आलेल्या गाडी ड्रायव्हरचा गंभीर मारहाण करून खून केला आहे.

इंदापूर तालुक्यातील गालांडवाडी नं १ येथील विशाल सूर्यवंशी पोल्ट्री फार्म वरती रियाज चुन्नुमीया जहागिरदार,वय ५२ ,रा. सय्यदनगर, लेन नं-२६ एक ,नुर मज्जित जवळ हडपसर ता- हवेली, जि- पुणे हे कोंबड्या गाडीत भरून घेऊन जाण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी कोंबड्या भरत असताना पोल्ट्री फार्म वरील कामगारांना लंगड्या कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका त्या कंपनीमध्ये घेतल्या जात नाहीत असे रियाज चुन्नुमीया जहागिरदार म्हणाले.

लंगड्या कोंबड्या आणू नका म्हणल्यानंतर विशाल सूर्यवंशी पोल्ट्री फार्मवरील कामगार निखिल जाधव, विकी नलावडे, लहू शिंदे (रा. गलांडवाडी नं-१, ता- इंदापूर, जि- पुणे) व विशाल कांबळे,रा-शिरसोडी ता- इंदापूर, जि- पुणे यांनी रियाज चुन्नुमीया जहागिरदार यांना हाताने तोंडावर व डोक्यामध्ये बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या झालेल्या मारहाणी मध्ये रियाज चुन्नुमीया जहागिरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागेवरती बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ बारामती येथे उपचारासाठी नेले व तेथून ससून हॉस्पिटल पुणे ते उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मारहाण केलेल्या काही आरोपींना इंदापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून पुढील कारवाई इंदापूर पोलीस करत आहेत. मात्र एखाद्या लंगड्या कोंबडीसाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेणे ही अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना घडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!