राजकीय

कसलेल्या पैलवानाला श्रीमंत ढोले सरांनी केले चितपट!

काटी–लाखेवाडी गटात श्रीमंत ढोले यांचा ऐतिहासिक विजय.

इंदापूर,दि १०

  • काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत ढोले यांनी भाजपचे मातब्बर नेते विलासबापू वाघमोडे यांचा दारुण पराभव करत इतिहास घडवला आहे.संपूर्ण इंदापूर तालुका तसेच पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या हायव्होल्टेज लढतीत श्रीमंत ढोले यांनी दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत दणक्यात प्रवेश केला.

भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरलेले विलासबापू वाघमोडे हे राजकारणातील ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले, धनगर समाजाचे ज्येष्ठ व प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. भाजपकडून त्यांना मोठी ताकद, रसद आणि संघटनात्मक पाठबळ मिळाले होते.

इंदापूरच्या राजकारणातील कसलेला पैलवान अशी ओळख असलेल्या विलास बापू वाघमोडे यांना राष्ट्रवादीच्या श्रीमंत ढोले यांनी अनुभव, ताकद आणि विरोधकांचा डंका असूनही निवडणुकीत बाजी मारली. ‘डंके की चोट’ प्रचार असूनही विलासबापू वाघमोडे यांना श्रीमंत ढोले यांच्यासमोर सपशेल पराभव स्वीकारावा लागला.

या निवडणुकीत श्रीमंत ढोले यांना २०,७१९ मते तर विलासबापू वाघमोडे यांना ७,६७२ मते मिळाली. तब्बल १३ हजारांहून अधिक मताधिक्याने श्रीमंत ढोले यांनी भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत काटी–लाखेवाडी गटावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

हा विजय केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नसून, इंदापूर तालुक्यातील राजकारणात श्रीमंत ढोले यांची ताकद, विश्वास आणि जनाधार पुन्हा एकदा सिद्ध करणारा ऐतिहासिक विजय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!