आज महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी ?
घटस्थापनेचा दिवस महायुतीचा मुहूर्त ठरला..
इंदापूर,दि.३
- लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं राज्यात वाहू लागलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडी मधील कोणत्या घटक पक्षाला विधानसभेच्या किती जागा मिळणार ?
या बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचं सत्र सुरूच आहे. सह्याद्री अतिगृहात महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतचे १०० उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे ५०, शिवसेनेचे ३६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे १४ उमेदावरांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या उमेदवारांची पहील यादी महायुतीकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. बहुतांश विद्यमान आमदारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत फटका…
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. महायुतीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या राज्यातील जागा वाढल्या, दरम्यान आता लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुतीची रणनिती काय असणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या यादीमध्ये इंदापूर मधील अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचेही नाव भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
अजित पवार गटाच्या या उमेदवारांची नावे संक्षिप्त यादीत असल्याची सूत्रांची माहिती..?
- १)अजित पवार(बारामती )
२) छगन भुजबळ (येवला)
३) हसन मुश्रीफ (कागल)
४) धनंजय मुंडे (परळी)
५) अदिती तटकरे (श्रीवर्धन)
६) धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) - ७) संजय बनसोडे (उदगीर)
- ८) अनिल पाटील (अमळनेर)
- ९) राजू कारेमोरे (तुमसर)
१०) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव)
११) दीपक चव्हाण (फलटण) - १२) नरहरी झिरवाळ (दिंडोरी)
- १३) इंद्रनील नाईक (पुसद)
१४) दत्तात्रय भरणे (इंदापूर) - १५) यशवंत माने (मोहोळ)
१६) दिलीप मोहिते (खेड आळंदी)
१७) सुनील शेळके (मावळ)