कोर्टाने चार वर्षाच्या चिमुकल्या मुलाला दिली जन्मठेपेची शिक्षा.
मुंबई,दि.२८
- चूक कोणीही करू शकते. जेव्हा लहान मुले किंवा तरुण मुले किंवा मुली कोणतीही चूक करतात तेव्हा त्यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना बालगृहात पाठवले जाते. आज आम्ही तुम्हाला एका अशा कथेबद्दल सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आता 4 वर्षाच्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा झाली तर कुणालाही आश्चर्य वाटेल. आम्ही इथे इजिप्तबद्दल बोलत आहोत जिथे 4 वर्षीय मन्सूर कुरानी अलीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे तिथल्या न्यायालयाने मन्सूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या लहान मुलाला 4 जणांची हत्या आणि 8 जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच पोलिसांना धमकावल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. ही बातमी इजिप्शियन जनतेच्या कानावर पडताच संपूर्ण देशाने एकजुटीने या निर्णयाचा निषेध केला.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तेथील लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. सोशल मीडियावरही या घटनेचा निषेध करण्यात आला. बड्या व्यक्तींनीही या प्रकरणावर जोरदार टीका केली, तरीही न्यायालयाच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नाही. तब्बल वर्षभरानंतर ही घटना जागतिक स्तरावर समोर आली तेव्हा संपूर्ण जगाने एकत्र येऊन इजिप्तच्या कायद्याचा तीव्र निषेध केला. दबावापोटी न्यायालयाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले. तपासाचे निकाल पाहून सर्वांनाच धक्का बसला कारण ज्या गुन्ह्यांसाठी मन्सूरला शिक्षा झाली आणि ज्या गुन्ह्यांसाठी तो तुरुंगात शिक्षा भोगत होता ते सर्व खोटे होते.
मन्सूरने असे काही केले नव्हते. मन्सूर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी न करताच त्याला शिक्षा झाली, असे प्रत्यक्षात घडले. 2014 मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या दंगलीत सहभागी झाल्याबद्दल न्यायालयाने मन्सूरसह अन्य 115 जणांना दोषी ठरवले होते. नंतर या घटनेची चौकशी करून तो निर्दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर न्यायालयाने मन्सूरच्या वडिलांची माफी मागावी अशी मागणी केली.