राज्यातील फार्मा विद्यार्थ्यांचा एस बी पाटील मध्ये जल्लोष; राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न.

इंदापूर,दि.६
- एस.बी.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे प्रथमच राज्यस्तरीय फार्मा व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री, राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष व एस बी पाटील या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक ३ व ४ नोव्हेंबर रोजी दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन कोतवाल (अध्यक्ष, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन, पुणे) उपस्थित होते. तसेच डॉ. प्रदीप बोडके (प्राचार्य, एस.बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. श्रीनिवास शिरकांडे (प्राचार्य, एस.बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज), उमेश बोधले (समन्वयक, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज) व श्री. संतोश देवकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, एस.बी. पाटील संस्था) हे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेच्या सचिव भाग्यश्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे, व विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, “खेळामुळे टीमवर्क, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात; खेळ ही जीवनशैली आहे जी क्रीडासंस्कार आणि टीम स्पिरिट वाढवते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
राज्यभरातील ३८ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, खेळाडूवृत्ती आणि शिस्त यांचे दर्शन घडवले.
प्रथम क्रमांक: शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, अलमाला (लातूर)
द्वितीय क्रमांक: पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी, दिघंची
तृतीय क्रमांक: N.B.S. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, औसा (लातूर)
विजेत्या संघांचा सन्मान डॉ. संपत नवले (सचिव, नॅशनल फार्मसी असोसिएशन, पुणे), डॉ. अमोल शहा (उपाध्यक्ष, नॅशनल फार्मसी असोसिएशन, पुणे) व डॉ. प्रदीप बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.समारोपाच्या वेळी प्राचार्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सांगितले की, “विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्यासाठी भविष्यात अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल.



