शरद पवार यांचा १०० दिवसांचा नवा डाव; शरद पवारांच्या शॅडो कॅबिनेटमध्ये हर्षवर्धन पाटलांवर दुहेरी जबाबदारी.

पुणे,दि.१
- सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे,राजेश टोपे,यांच्यावर पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. तर हर्षवर्धन पाटील यांच्यावर या शॅडो कॅबिनेटमध्ये दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे.
नव्या उमेदीने कामाला लागा, अशा सूचना देखील शरद पवारांच्या बैठकीत देण्यात आल्या आहे. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीला सामोरा गेला पाहिजे यासाठी पक्षाकडून महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे.
विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि ३ महिन्यांत अहवाल द्या, असे आदेश देण्यात आले आहेत. पक्ष संघटनवाढीसाठी शरद पवारांच्या पक्षाचा नवा अजेंडा राबवण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हंड्रेड डेज ट्रॅकींग टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील.
सरकारच्या १०० दिवसीय कार्यक्रमावर शरद पवारांची शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे. नव्या उमेदीनं कामाला लागा, शरद पवार यांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहे. शरद पवार गटाकडून महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे. विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि तीन महिन्यांत अहवाल द्या, असे आदेश शरद पवारांनी विभागीय प्रभारींना देण्यात आल्या आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे
विभागीय प्रभारी पुढीलप्रमाणे…
प. महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील
उत्तर महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील
मराठवाडा- राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर
विदर्भ- राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख
कोकण- जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा तसेच
फहाद एहमद यांची राष्ट्रीय युवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.