आरोग्य

एस.बी.पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रदीप बोडके यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड.

इंदापूर,दि १६

  • एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, वनगळी (ता. इंदापूर) येथील प्राचार्य डॉ. प्रदीप लालासाहेब बोडके यांची नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. फार्मसी शिक्षण, संशोधन, व्यावसायिक विकास तसेच विद्यार्थी-फार्मासिस्टांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांचा पारितोषिक वितरण व नियुक्ती समारंभ जेएसपीएम शैक्षणिक संकुलातील जयवंत सभागृह, हडपसर (पुणे) येथे शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय डॉ. श्री. महेश बुरांडे (संचालक, फार्मास्युटिकल सायन्सेस, जीएसटीएम युनिव्हर्सिटी, पुणे), आदरणीय श्री. विजय पाटील (सदस्य, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली) तसेच डॉ. श्री. सचिन कोतवाल (अध्यक्ष, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय फार्मसी क्षेत्रातील अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. प्रदीप बोडके यांना पश्चिम महाराष्ट्र उपविभागीय अध्यक्षपदाचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. डॉ. बोडके यांच्या नेतृत्वाखाली फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, व्यावसायिकांच्या अडचणींना वाचा मिळेल तसेच विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब,उपाध्यक्ष अंकिता ठाकरे-पाटील, सचिव भाग्यश्री पाटील तसेच विश्वस्त राजवर्धन पाटील साहेब यांनी डॉ. प्रदीप बोडके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. प्रदीप बोडके यांच्या या निवडीमुळे एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षण व व्यावसायिक क्षेत्राचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत होणार असून, फार्मसी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवड निश्चितच दिशादर्शक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!