जनतेची झाली तयारी;हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी.
इंदापूर,दि २८
- गेले काही दिवसांपासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच इंदापूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेत आला आहे . माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे थेट शरद पवार यांच्या संपर्कात असून ते लवकरच तुतारी हाती घेतील अशी चर्चा सुरू असताना. इंदापूर तालुक्यातील जनतेची झाली तयारी; हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी अशा आशयाचे बॅनर हर्षवर्धन पाटील समर्थकांकडून सोशल मीडिया वरती फिरू लागले आहेत.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये सीटिंग आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांना सुटणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर मध्ये झालेल्या जनसन्मान यात्रे वेळी दिले आहेत. मात्र कायम अजित पवार यांनी शब्द देऊन फिरवल्याने हर्षवर्धन पाटील समर्थकांमध्ये अजित पवार यांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांना कार्यकर्त्यांकडून तुतारी हाती घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करा असा आग्रह करत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढवला जात आहे.
हर्षवर्धन पाटील हे कायम कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू मानत असतात. त्याच कार्यकर्त्यांनी आज इंदापूर तालुक्यात जनतेची झाली आहे तयारी; हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी अशा आशयाचे बॅनर स्टेटस ठेवत सोशल मीडिया वरती फिरवले गेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांच्या दबावापोटी हर्षवर्धन पाटील यांना तुतारी हाती घेत इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे.