इंदापूर,दि.२८
संपूर्ण राज्यसह पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन विभागाच्या जमिनीवरती अनेक धन दांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. गोरगरिबांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसताना या धन दांडग्या लोकांनी पांढऱ्याची काळी कागदे रंगवत चक्क वनविभागाच्या अनेक जमिनी गिळंकृत केल्या आहेत. त्यातच इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील श्रीमंत ढोले यांना तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक पुणे यांनी दिले आहेत.
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे राखीव जंगल सर्वे नंबर ५४८/गट नंबर ४८५ मध्ये क्षेत्रफळ एकूण ९१ एकर २४ गुंठे आहे. सदरचे फॉरेस्ट अंदाजे १८८० साली निर्माण झालेले आहे. या सर्व क्षेत्राचे बनावट गॅझेट क्रमांक S/३६/७/८५२४,DT ०९/०९/१९३४ तयार करून श्रीमंत पोपट ढोले, रा- लाखेवाडी व इतर ४ जणांनी एकूण क्षेत्र ७ हेक्टर महसुली ७/१२ उताऱ्यामध्ये भूधारणापद्धतीने भोगावठादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर केले असल्याचे आदेशामध्ये म्हटले आहे.
तसेच लाखेवाडी या गावातील वन जमिनी संदर्भात आपल्याकडे सर्व अभिप्राय व ना हरकत तात्काळ रद्द करून तसेच या कार्यालयास विना विलंब कळविण्यात येण्याचे आदेश दिले असून महसूल विभागाशी संपर्कात राहून महसूल दस्तऐवज सातबारा अभिलेखांमध्ये निर्वाणीकरण नोंद असल्याने सदर नोंद रद्द करण्याविषयी उपवनसंरक्षक पुणे यांनी स्वतः पाठपुरावा करून तसा अहवाल या कारल्यास सादर करावा असा आदेश देण्यात आला आहे.
त्यामुळे निर्वाणीकरणाच्या आधी सूचनाच्या अनुषंगाने देण्यात आलेली ना हरकत/अभिप्राय संदर्भीय पत्र क्रमांक २ ते ५ अन्वये रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वरील क्षेत्रामध्ये वनेत्तर कामे झाली नसल्याची तात्काळ खात्री करावी व या क्षेत्रामध्ये वनेत्तर कामे झाली असल्यास तात्काळ अतिक्रमण हटविण्यात कार्यवाही करण्यात यावी. तसेच भविष्यात या क्षेत्रावर कोणतेही प्रकारचे वनेत्तर काम होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरची बाब अति तातडीने असून प्रथम प्राधान्याने करण्यात यावी अन्यथा भविष्यात उद्भवणारे पेज प्रसंग आपण जबाबदार राहाल असे स्पष्ट आदेश मुख्य वनसंरक्षक पुणे यांनी दिले आहेत.सदर चा आदेश १/०७/२०२४ रोजी दिला आहे.या सर्व आदेशामुळे लाखेवाडी येथील श्रीमंत ढोले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.