इंदापूर मधील राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यावर ॲट्रॉसिटी सह आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल.
दोन दिवसांपूर्वी केला होता गोळीबार.

इंदापूर, दि.१५
- गेली दोन दिवसांपासून इंदापूर मध्ये गोळीबार केल्याची चर्चा सुरू होती. मात्र अखेर त्या चर्चेला बळ मिळाले असून गोळीबार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षा विरोधात ॲट्रॉसिटी सह आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की १५ दिवसांपूर्वी संबंधित तक्रारदार महिला रस्त्याने जात असताना. इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष देविदास उर्फ बाळासाहेब ढवळे हे काळ्या रंगाच्या गाडीतून संबंधित तक्रारदार महिलेला आडवे येऊन गाडीच्या काचा उघडून तू मला लय आवडते. तुझा नवरा माझा मित्र आहे. मी बघतो काय करायचे ते मला भेट असे बोलण्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
संबंधित प्रकार घडल्यानंतर भांडण होईल या भीतीने संबंधित महिला घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेली. मात्र आरोपी देविदास उर्फ बाळासाहेब ढवळे हे कायम त्या महिलेला कामावरून येता जाताना गाडी आडवी लावून सतत तेच वक्तव्य करू लागले असे नमूद केले आहे. त्यानंतर शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे नामक व्यक्ती संबंधित महिले जवळ कार मधून येऊन महिलेचा हात धरून गाडीमध्ये बस तुला बोलायचे आहे असे म्हणत गाडीमध्ये बसवत असताना मी हात सोडून त्या ठिकाणाहून निघून गेली व सतत होणारा त्रास मी माझ्या नवऱ्याला सांगितला असे तक्रारीत नमूद केले आहे.
त्यानंतर दि.१२ रोजी माझे पती घरी उशिरापर्यंत न आल्याने मला भीती वाटत असल्याने मी रात्री ११:५० माझ्या भाच्या सोबत व पतीच्या मित्रांसोबत आमच्या गाडीतून शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांच्या घराकडे गेले असता माझे पती भूषण व त्यांचे मित्र मनोज आनंतकर यांना चार-पाच लोक झटापटी करत असताना दिसले. त्यानंतर शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे या व्यक्तीने घरामध्ये पळत जाऊन हातात पिस्तूल घेत माझ्या पतीवर एकापाठोपाठ एक अशा तीन गोळ्या झाडत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
संबंधित घटनेनंतर आम्ही घाबरून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गेलो नाही. मात्र संबंधित प्रकरणाबाबत माझी शैलेश उर्फ बाळासाहेब ढवळे राहणार- बारामती रोड, इंदापूर व त्यांचे भाऊ शुभम पवार आणि इतर चार-पाच लोकांविरोधात माझ्या नवऱ्याला गोळ्या घालून ठार करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
संबंधित तक्रारीनंतर इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांच्या सह इतर साथीदारांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या कायद्यानुसार तसेच आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष बाब म्हणजे संबंधित गंभीर गुन्हा घडून थेट अंगावरती गोळीबार करणाऱ्या आरोपीवर ३०७ सारखा गुन्हा दाखल का झाला नाही..?
संबंधित महिलेला पोलीस स्टेशन मध्ये रात्रभर गुन्हा दाखल करण्यासाठी का बसावं लागलं..?संबंधित प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून तहसील कार्यालयातील एका जबाबदार कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून दिशाभूल करत संबंधित कर्मचाऱ्याला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न झाला का..?
संबंधित गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल फॉरेन्सिक लॅब कडे तपासून त्याच्यातील गोळ्यांची मोजणी केली जाणार का..?
संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी नेमका कोणाचा दबाव होता..?
इंदापूर मधील सामान्य जनता सुरक्षित नाही का…? असे अनेक प्रश्न इंदापूर शहरातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. त्या प्रश्नांची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा काळ सोखवल्याशिवाय राहणार नाही.
दोन दिवसांपूर्वी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनीही संबंधित तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



