राजकीय

काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार;श्रीमंत ढोले यांचा विजय निश्चित.

इंदापूर,दि २५

  • काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत ढोले यांचा विजय निश्चित मानला जात असून गटात राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

काटी-लाखेवाडी गटातील मतदार विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारे असून भावनांना बळी न पडता काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र आहे. याच विश्वासावर श्रीमंत ढोले यांनी नागरिकांमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना कायम मदतीचा हात, गावोगावी निर्माण झालेली भक्कम ताकद, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान यामुळे ढोले यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.

या निवडणुकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांचा दांडगा जनसंपर्कही ढोले यांच्या पाठीशी उभा असून याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होताना दिसत आहे.

सद्यस्थितीला जरी राजकीय वातावरण काहीसे भावनिक वाटत असले तरी अंतिम निर्णय विकासाच्या आधारावरच होतो, आणि त्यामुळेच काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात श्रीमंत ढोले यांचा मोठा विजय तर भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!