राजकीय

खा.सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी.

पुणे,दि २५

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याांच्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

सुप्रिया सुळे यांची सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार आहे, त्यासाठी चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. याआधीही सुप्रिया सुळे यांची निवड ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात करण्यात आली होती.

संसदेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या संसदरत्न खासदार म्हणून परिचित असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने आणखी मोठी जबाबदारी सोपवील आहे. परदेशात व्यापार कराराबाबत संसदीय मैत्री समितीमध्ये महाराष्ट्रातून विरोधी गटातील खासदार सुप्रिया सुळे यांना संधी देण्यात आली.

सुप्रिया सुळे या सिंगापूर देशासोबत जो व्यापारी करार होणार आहे, त्यासाठी चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. यापूर्वी सुद्धा ॲापरेशन सिंदूरबाबत एक शिष्टमंडळ स्थापन करण्यात आलं होतं. या शिष्टमंडळाला जगभरात पाठवण्यात आलं होतं. यावेळी विरोधी गटातून खासदार सुप्रिया सुळे यांचा सहभाग होता.

याआधी देखील खासदार सुप्रिया सुळे यांची अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि संसदीय समित्यांवर निवड झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी संसदेत माहिती तंत्रज्ञान, गृह व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या स्थायी समित्यांवर काम केलं आहे. वेगवेळ्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी आणि धोरणात्मक चर्चेसाठी स्थापन होणाऱ्या संसदीय मैत्री गटांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!