मंत्री दत्तात्रय भरणे यांचा उद्या इंदापूर मध्ये उद्या नागरी सत्कार.
दुपारी तीन वाजता होणार कार्यक्रम.
इंदापूर,दि.२१
इंदापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (AP) व महायुतीच्या घटक पक्ष यांच्या वतीने नवनियुक्त कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा उद्या रविवारी (दि.२२) नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यायानंतर प्रथमच इंदापुर तालुक्यात येत आहेत.
या बाबत इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (AP) यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आ. दत्तात्रय भरणे यांची निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर नागरिक सत्कार उद्या रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजता इंदापूर येथील वाघ पॅलेस येते होणार आहे. अशी माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे व इंदापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी दिली.