क्रीडा

इंदापूर सायकल अँड रनर्स क्लब चे सदस्य दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविणार.

इंदापूर,दि.३

  • जगातील सर्वात खडतर मॅरेथॉनपैकी एक असलेली ९० किमी.ची कॉम्रेड मॅरेथॉन ही दक्षिण आफ्रिकेमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येते. जगभरातील १३० पेक्षा अधिक देशांमधील धावपटू या स्पर्धेत भाग घेतात. यंदा भारतातील अनेक जण कॉम्रेड मॅरेथॉनकरिता पात्र ठरले असून त्यामध्ये इंदापूर मधील “इंदापूर सायकल अँड रनर्स क्लब चे तीन सदस्य सहभाग घेणार आहेत. या सहभागामुळे इंदापूरच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

कॉम्रेड मॅरेथॉन ही दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी होणारी एक प्रसिद्ध अल्ट्रा-मॅरेथॉन शर्यत आहे, जी डर्बन आणि पीटरमॅरिट्झबर्ग या शहरांदरम्यान आयोजित केली जाते. या शर्यतीचे अंतर सुमारे ९० किलोमीटर आहे.कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सायकलिंगचा संबंध असा आहे की,काही धावपटू या शर्यतीत सहभागी होण्यासाठी लांब अंतरावरून सायकलने प्रवास करतात.काही धावपटू केप टाउन किंवा इतर दूरच्या ठिकाणांहून सायकलने पीटरमॅरिट्झबर्गला येऊन शर्यतीत भाग घेतात.

जगातील सर्वात मोठ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील इंदापूर सायकल अँड रनर्स क्लब चे सदस्य संतोष वाघचौरे, गोपीनाथ मोरे व संदीप जाधव हे सहभागी होणार आहेत.

या सदस्यांचा सत्कार राष्ट्रसेवा दलाचे पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रमेश शिंदे, राष्ट्रसेवा दलाचे पुणे जिल्हा सहसचिव ऋषिकांत भोसले, इंदापूर सायकल क्लब चे अध्यक्ष सुनील मोहिते, अवधूत पाटील व गायकवाड सर यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!