सामाजिक
पत्रकार हा समाजाचा आरसा-महारूद्र पाटील .
पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंदापूर मधील पत्रकारांचा महारुद्र पाटील यांच्याकडून सन्मान.
इंदापूर,दि ७
- पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांच्या निर्भीड, निःपक्षपाती लेखणीमुळे अन्यायाला वाचा फुटते. सर्वसामान्य नागरिक आणि वंचितांना न्याय मिळतो. यासह चुकीच्या गोष्टीना पायबंद घालण्याची भूमिका पत्रकार कायम निभावत असतात, असे प्रतिपादन इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले. इंदापूर तालुक्यातील सर्वानी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला.या वेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले की पत्रकार कायम आपल्या लेखणीने सभोवताली घडणाऱ्या गोष्टीचे निरीक्षण, अवलोकन तसेच सामाजिक दायित्व म्हणून प्रश्न सोडविण्यास प्रशासनास सहकार्य करतात. त्यांच्या लेखणीने प्रशासनास कायम दक्ष राखण्यास मदत मिळते.पत्रकार दिन सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचे आपणांस देखील समाधान आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की पत्रकार हा कायम समाजाच्या प्रती सतर्क राहत दिशाहीन झालेल्या व्यक्तीस दिशा देण्याचे काम निस्वार्थ भावनेने करतात. त्यांनी लिहलेली प्रत्येक बातमी समाजासह प्रशासनास, व्यक्तीस आणि सर्वसामान्य नागरिकांना लढा देण्याचे बळ निर्माण करते. त्यांच्या कार्याचा आणि निरपक्ष पत्रकारितेचे कौतुक करणे प्रत्येकाची जबाबदारी बनते.