विशेष
इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी.
डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी जेरबंद.

इंदापूर,दि.२७
- इंदापूर शहरांमधील साई सेवा हॉस्पिटल मधील डॉक्टर दडस यांना मारहाण करण्यात आली होती.या प्रकरणातील आरोपी मारहाण करून फरार झाले होते. या फरार झालेल्या आरोपींना अवघ्या ३२ तासात जेरबंद करण्यात इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून तात्काळ कारवाई करून इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे.
सदर प्रकरणातील आरोपी १) नाना उर्फ अभिषेक आण्णा कोळेकर.रा.तरंगवाडी ,२)दैवत उर्फ देवा रामचंद्र जाधव, ३) रवींद्र दत्तात्रय बंडलकर दोघेही राहणार कौठळी ,ता. इंदापूर, जिल्हा- पुणे हे डॉक्टर दडस यांना मारहाण करून फरार झाले होते. मात्र इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ शोध चक्रे फिरवत संबंधित आरोपींना अवघ्या ३२ तासात जेरबंद केले.
सदरची कामगिरी इंदापूर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकातील सहा.पो. फौजदार प्रकाश माने, पो.हवा. विनोद रासकर, पोलीस अंमलदार नंदू जाधव, गणेश डेरे व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून केली आहे.



