विशेष

इंदापूर बाजार समितीची वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

इंदापूर,दि.१५

  • इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर जि. पुणे या संस्थेची सन २०२४-२०२५ या अर्थिक वर्षाची तेरावी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवार दि.१४ सप्टेंबर-२०२५ रोजी बाजार समितीच्या मुख्य बाजार आवार इंदापूर डाळींब मार्केट यार्ड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत व सभापती तुषार देवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व इंदापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ इंदापूर या संस्थेची ६५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

यावेळी बोलताना बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की इंदापूर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने समितीत येणारा प्रत्येक शेतकरी व संबंधित घटकांना न्याय तसेच शेतमाल अनुशंगिक सोयी-सुविधा देण्याचे काम बाजार समितीमार्फत केले जाणार आहे. समिती लवकरच इंदापूर येथे केळी मार्केट पुर्ववत करणार आहे. तसेच भुसार, मासे(मासळी), फुले, डाळींब, पेरु, कांदा, ड्रॅगन फ्रुट व सिताफळ या कार्यरत असलेल्या मार्केट वाढीस प्रयत्न करणार आहे. मुख्य बाजार इंदापूर येथे शेतकरी निवास, उपबाजार भिगवण येथे अधुनिक शॉपींग मॉल, मुख्य बाजार इंदापूर शहर व उपबाजार निमगांव-केतकी येथे नविन पेट्रोल पंप व इतर शेतकरी घटकांकरीता शेतमाल खरेदी-विक्री अनुशंगिक सोयी-सुविधा उभारणीचे धोरण आहे अशी माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी प्रयत्नशील राहणारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आज शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे. पारदर्शक खरेदी-विक्री प्रक्रिया, त्वरित देयक, डिजिटल व्यवहार व्यवस्था आणि आधुनिक सोयी-सुविधांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास बाजार समितीवर अधिक दृढ झाला आहे.

तुषार जाधव,(सभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर)

यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, संचालक माजी आमदार यशवंत(तात्या) माने, संग्राम सिंह निंबाळकर, विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संदिप पाटील, रुपालीताई संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, खरेदी-विक्रीचे चेअरमन प्रताप पालवे, व्हा. चेअरमन विजय घोगरे सह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!