शहा गावात विविध विकास कामांचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

इंदापूर,दि.५
- शहा गावातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खरेदी-विक्री संघाचे संचालक मधुकर भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते या कामांचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन करण्यात आलेल्या कामांमध्ये शहागावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, ईजगुडे वस्तीवरील सिमेंट रस्ता तसेच बाह्यवळण रस्ता या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे.
शहा गावामध्ये झालेल्या कामांमुळे गावातील वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.गावातील नागरिकांनी या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत उद्घाटन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, संदेश देवकर, शिवाजी तरंगे, शहा गावचे माजी सरपंच विष्णू पाटील, माजी सरपंच नितीन निकम, सरडेवाडीचे माजी उपसरपंच सतीश चित्राव, दत्तात्रय जगदाळे, शिवाजी शिंदे, किशोर धाईंजे, रोहिदास ईजगुडे, आबा देवकाते, महादेव लांडगे, तानाजी ईजगुडे, इरफान मुलाणी, शैलेश भोई, सुभाष भोई, तानाजी गंगावणे, संभाजी जाधव, सतिश शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.



