काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून अमोल मुळे यांचे नाव अग्रस्थानी.
सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि नेतृत्वगुणांमुळे तरुण नेतृत्वाचा उदय!

इंदापूर,दि.१
- इंदापूर तालुक्यातील काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून अमोल मुळे यांचे नाव सध्या प्रबळ चर्चेत आले आहे. सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, तळागाळातील जनसंपर्क आणि प्रत्येक नागरिकाशी जोडलेले नाते यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
अमोल मुळे यांनी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्य वाढविण्यात काटी–वडापुरी जिल्हा परिषद गटात महत्वाची भूमिका बजावली होती. गावागावात जाऊन लोकांशी थेट संवाद साधत त्यांनी पक्षाचा संदेश आणि कार्य प्रभावीपणे पोहोचवला. त्यांचे हे संघटन कौशल्य आणि लोकसंपर्क पाहता भाजपमध्ये त्यांना एक सकस आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
युवा नेते प्रवीण माने यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू सहकारी असून माने यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विधानसभा निवडणुकीत गटातील मतदानात महत्त्वपूर्ण वाढ घडवून आणली होती. प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभाग, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि शांत नेतृत्वशैली यामुळे ते तरुण वर्गात लोकप्रिय झाले आहेत.
शांत, विचारशील आणि प्रगल्भ दृष्टिकोन असलेले अमोल मुळे हे काटी–लाखेवाडी गटातील नागरिकांच्या अडीअडचणीत नेहमीच मदतीला धाव घेतात. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या नावावर जनतेचा विश्वास वाढत असून भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या तरुण नेत्याचा उदय हा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपसाठी नवा उर्जास्त्रोत ठरू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.



