
इंदापूर,दि.२४
- इंदापूर तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तालुक्यातील विविध भागात अभ्यासिका व ग्रंथालये उभारणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
भरणेवाडी ता.इंदापूर येथे मंत्री भरणे यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या व पोलिस भरती झालेल्या ४६ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.यावेळी छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,सचिन सपकळ, दिपक रायकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी आज विविध पदांवर जात असल्याचा आपणास आनंद वाटतो आहे.आपण नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला महत्व दिले आहे.आपण अंथूर्णे व इंदापूर येथे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध करून दिले आहे.
सध्या क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वालचंदनगर,निमगाव केतकी,कळंब आदी गावांमध्ये खेळाची ग्राउंड व अभ्यासिका उभारण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.लवकरच तालुक्यातील विविध भागात आपण अभ्यासिका उभारणार…