विशेष

सराटी मध्ये हलगर्जीपणा अंगलट ; पिस्टलमधून अचानक सुटलेल्या गोळीने एक जण गंभीर जखमी.

विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे उपचारासाठी दाखल.

इंदापूर,दि.२५

  • इंदापूर तालुक्यातील सराटीमध्ये जगदाळे फार्म येथे परवाना असलेलं पिस्टल हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झाला आहे. शनिवारी दुपारी चार वाजताच्या सराटीतील जगदाळे फार्म हाऊस येथे ही घटना घडली.

सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत. रात्री उशिरा इंदापूर पोलिसांनी या घटनेतील चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रदिप नानासाहेब जगदाळे (रा. सराटी, ता. इंदापूर), सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख (रा. टेंभुर्णी, ता. माढा), विजय शिवाजी पवार (रा. बेंबळे, ता. माढा) आणि राजकुमार दिलीपराव पाटील (रा. अकोले, ता. माढा) अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्म हाउसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र आले होते.

याच वेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हे हातळत होते. याच वेळी या पिस्टलमधून गोळी सुटली ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. यामध्ये ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी, एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत.सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे विश्वराज हॉस्पिटलमध्ये रुग्णाची प्रकृती पाहण्यासाठी दाखल झाले होते.

पोलीस अधीक्षक संदीप गिल सदर  घटनेबाबत माहिती देताना  म्हणाले की मित्राची बंदूक हाताळताना महाडिक यांना स्वतः गोळी लागली आहे. त्यांना शस्त्रक्रियेसाठी विश्वराज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यास येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!