सामाजिक

अजितदादांच्या क्रांतिकारी निर्णयामुळे लाडक्या बहिणींना चांगले दिवस.

इंदापूर,दि.१२

  • महिला सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींकरिता घेतलेले क्रांतिकारी निर्णय ऐतिहासिक ठरत आहे. राज्य सरकारमार्फत महिलांच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून देताच अनेक बहिणींना दिलासा मिळत आहे. स्वयंसहायता गटांना भांडवल, उद्योजकतेसाठी कर्जावरील व्याजदर सवलत, तसेच महिला वसतिगृह व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणी यामुळे घराघरातील बहिणींना रोजगार व सुरक्षिततेचे नवे मार्ग खुलले आहेत.

मुलींच्या शिक्षणासाठी खास निधी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी सायकल व वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे शहरीच नव्हे तर ग्रामीण बहिणींनाही शिक्षणाची संधी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

अजितदादा राज्याचे सध्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत. राज्यामध्ये कोणत्या योजनेसाठी किती निधी द्यायचा हे अजितदादांचे मंत्रालय ठरवते. दादा हे कायम जनतेशी एकरूप असलेले नेते असून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात कामाचा ठसा उमटविला आहे.

अजितदादा यांच्या या उपक्रमामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. समाजातील सर्व स्तरातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी हा निर्णय एक मोठे पाऊल असून सर्वत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!