शिंदे कुटुबाने समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून देवराई निर्मिती केली – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ.
भाटनिमगाव मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे परिवाराकडून देवराईची निर्मिती.

इंदापूर,दि.१८
- दि.१७ रोजी इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुशीलकुमार भागवत शिंदे व विजय भागवत शिंदे यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करत तब्बल दोन एकरामध्ये देवराईची निर्मिती केली आहे. या देवराईचे निर्मिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की सुशीलकुमार शिंदे व विजय शिंदे यांच्या कुटुंबाचे आणि आमचे अतिशय जवळचा कौटुंबिक स्नेह आहे. शिंदे कुटुंबाने आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस साजरा करत असताना त्याला चांगले स्वरूप कसे देता येईल याचे काम केले. आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस हा समाजासाठी असला पाहिजे, त्याच्यामध्ये समाजाचे हित असले पाहिजे, समाजाचे भले कसे करता येईल याची भावना मनामध्ये असली पाहिजे हाच दुरगामी विचार करून सुशीलकुमार शिंदे व विजय शिंदे यांच्या कुटुंबाने राज्याचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी देवराईची निर्मिती केली आहे.
ते पुढे म्हणाले की शिंदे कुटुंबाचा आणि माझा अगदी जवळचा स्नेह आहे. त्यांनी अतिशय चांगला उपक्रम हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतला आहे. शिंदे कुटुंबाने हा घेतलेला कार्यक्रम हा माझ्या घरातील कार्यक्रम आहे. मी एका शेतकरी कुटुंबातील असून आमची नाती ही माती मधली आहेत. भाटनिमगाव मध्ये आल्यानंतर मला माझ्या गावांमध्ये आल्याचा भाव आहे. मी येताना सुशीलकुमार ला म्हणालो तुमचा तालुका सुजलाम सुफलाम आहे. सुशील च्या वडिलांना म्हणजे भाऊंना पाहिल्यानंतर मला माझ्या वडिलांचा भास झाला माझे वडीलही असेच पेहराव करतात.
या कार्यक्रमाला येण्यासाठी सुशीलकुमार यांनी विचारणा केल्यानंतर मला नाही म्हणण्याचे काही कारणच वाटले नाही. कारण माझे आणि त्यांचे अतिशय सलोख्याचे आणि कौटुंबिक स्नेह आहे. हा कार्यक्रम मनाला आनंद देणारा व मनसुखावणारा आहे. त्यामुळे आल्यापासून मी घड्याळ आणि वेळ किती झाला हे पाहिले नाही. कार्यक्रम घेण्यामागची भावना समजली की निसर्गाचा एक नियम आहे “तुम्ही जे पेराल तेच मिळते’. त्यामुळे मी पुन्हा भाटनिमगाव मध्ये शिंदे परिवाराने उभारलेल्या देवराई मध्ये नक्की येईल असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांना दिला.
“पक्षी उडे आकाशी चित त्याचे पिल्लापाशी’…!!
मी जरी देशभर फिरत असलो तरी “पक्षी उडे आकाशी चित त्याचे पिल्लापाशी’ जरी मी देशामध्ये कुठेही फिरलो तरी शेवटी मी पुण्यामधून जातो माझे शहर व माझ्या जिल्ह्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्मीयता आहे.
—केंद्रीय राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ.
शिंदे कुटुंबाने शून्यातून सुरुवात केली-प्रवीण माने.
भागवत शिंदे उर्फ भाऊंचे कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब होते. या कुटुंबातील दोन मुले म्हणजेच सुशीलकुमार शिंदे व विजय शिंदे यांना भागवत शिंदे यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण शिकवले. दोन्हीही मुलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आणि आज त्यांनी आपल्या कुटुंबाला नावलौकिक मिळवून दिले आहे असे मत प्रवीण माने यांनी व्यक्त केले.



