राजकीय

नगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे; जाहीर नागरी सत्कारात मोठे वक्तव्य होणार?

इंदापूर,दि २७

  • इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत (सेठ) शहा तसेच नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
    या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन माजी नगरसेवक पोपट शिंदे व रमेश शिंदे यांनी केले असून, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने इंदापूर नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर भरत (सेठ) शहा यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला असून, जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच जाहीर नागरी सत्कार ठरणार आहे.या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे नगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच इंदापूरमध्ये येत असल्याने, इंदापूरच्या विकासाबाबत, नगरपालिकेतील सत्ताबदलावरते काय वक्तव्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

हा जाहीर नागरी सत्कार केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता, इंदापूरच्या आगामी राजकीय दिशा व विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!